Header Ads Widget

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

असंतोषाच्या रूपात बदलता भारत


असंतोषाच्या रूपात बदलता भारत ...








कोणत्याही राष्ट्राच्या जडणघडणीत त्या राष्टाचे लोक,शासन,ध्येयधोरणे,विज्ञान,तंत्रज्ञान,कायदाव सुव्यवस्था महत्वाची असते.अशा लोकशाही राष्ट्रातील जनता आणि जनतेचा राष्ट्र म्हणून जेव्हा त्याकडे पाहिलं जातं त्यात केवळ राष्ट्रहित महत्वाचे असते. ना कुठला, धर्म,पंथ,पक्ष ना कुठले विशेषतः महत्वाचे नसते.पण गेली काही दशकात भारतीय समाज व्यवस्थेत आमूलाग्र बदल झाले .पण त्या बदलातील सामाजिक न्याय आजही मागास आहे. अशा माणसाला सामाजिक न्यायापासून दूर करून देशात नेमकं काय चाललंय याकडेही कानाडोळा केला जात आहे.माणसाच्या मूलभूत समस्यांना बगल देऊन जी ध्येयधोरणे धोरणे राबवली जात असतात अशी ध्येयधोरणे काही काळानंतर सपशेल फेल ठरतात.याचा प्रत्यय आज येऊ लागला. म्हणून राष्ट्र उभारणीत केवळ तंत्रज्ञान विकसित करणे,भांडवलवादाला उभारी देणे हा विकास नाहीच.एक हजार कामगारांचे काम एक मशीन जर करू लागली,त्यात श्रम,वेळ बचत होऊ लागली व उत्पादनही वाढले ही आपली उन्नती ग्राह्य धरली तर बाकी एक हजार कामगारांचा रोजगार जाऊन त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला?याकडेही लक्ष आजपर्यंतच्या सामाजिक बदलात द्यावा लागत होता. पण तो देला गेलाच नाही.हा प्रकार आज सगळ्याच क्षेत्रात निर्माण झाल्याने वाढती बेरोजगारी आणि बेरोजगरीतून निर्माण झालेले विविध सामाजिक,आर्थिक,राजकीय,शैक्षणिक प्रश्नांचा  लोंढा आज देशात निर्माण झाला. यातच या द्विपंचवार्षिक राजसत्तेच्या काळात भारतीय प्रसार माध्यमातून,राजकीय अजेंडयातुन मोठमोठ्या घोषणाबाजी झाल्या.यातच खाजगीकारणाचे हात भरून देशातील उत्पन्न वाढीचे स्रोत भांडवलदार,विशिष्ट,उद्योजक,कारखानदार यापुरते मर्यादीत केले.यातच देशात एकच पेव फुटले.धर्म ,मंदिर ,मस्जिद ,आंदोलने,आणि पेटती सामाजिक असंवेदनशिलता.रोज रोज  माध्यमांनी मुख्य प्रश्नापासून तोंड लपवले तरी  ते मुद्दे मात्र दबल्या जात नसतात.पोटाचा प्रश्न तोपर्यंतच दाबुन राहतो जोपर्यंत त्याला भूक लागत नाही. मानसिक गुलामगिरीतून लक्ष विचलित करता येते सोबतच वेदनेची करणे लपवल्या जाऊ शकतात पण वेदना नाही.अशा असंख्य प्रश्नांनी भारतीय जनता झुंजत आहे आणि देशात या प्रश्नाच्या उपाययोजनात धोरणे राबविण्याच्या ऐवजी सरकार कडून  देशातील लोकांना वेगवेगळ्या मुद्याला हायलाइट करून जवळपास पंधरा पंधरा दिवसाचा प्रपोगंडा राबवत आहे.आज या मुद्यावर तर काही दिवसांनी त्या मुद्यावर राष्ट्रीय स्तरावर वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. हा सारा प्रकार गेली बऱ्याच दिवसापासून चालू असल्याने वृत्तवाहिन्यातील डिबेट,त्याच त्या बातम्या पाहणे हे जनतेला अनावडणीय झाले.केवळ आणि केवळ भावनांच्या भोवताली गोऊन जी पोकळ आश्वासने दिली जात आहेत.आज घडीला भारतीय अर्थव्यवस्था कोलमडून पडली असताना यातील कारणांच्या बाबतीत मूग गिळून बसलेली शासनव्यवस्था सामान्य जनतेला एक प्रकारे फसवण्याचा प्रकार करत आहे. आज करोनाच्या बाबतीत तोच प्रकार चालू असून यातील वेगवेगळी अमानवीय प्रकारातून पैसा, बिल, अनुदान मिळवण्यासाठी मानवाच्या जीविताशी खेळण्याचे असंख्य प्रकार उघडकीस येत आहेत.काल पर्वा देशातील बेरोजगार तरुणांनी नोकरी,रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावी यासाठी थाळ्या,घंटा नाद करून सरकारला जाब विचारला. विशेष म्हणजे या दशकात जेवढी आंदोलने झाली तेवढी आंदोलने ,मोर्चे  भारतीय स्वातंत्र्य आंदोलन सोडली तर   कधीच इतकी झाली नाहीत .डॉक्टर,  शेतकरी,विध्यार्थी ,वेगवेगळी उत्पादन करणार घटक,अन्यायग्रस्त,वेगवेगळ्या विभागातील शासकीय कर्मचारी यासह अनेक घटकांनी रस्त्यावर उतरलेले दिसते.या मोर्चे,आंदोलनात एक बाब पुन्हा प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या आंदोलकावर,हल्ले,लाठीहल्ले,करून बरीच आंदोलने धुडकावून लावण्याचे प्रकार घडले. व ते का घडले?नागरिकांना आपल्या मागण्या मांडण्याचा, आपल्या प्रश्नासाठी,न्याय हक्कासाठी लढण्याचा,आंदोलन करण्याचा अधिकार नाही ,की सरकारला ते मान्य नाही या प्रश्नाचे उत्तर नेहमीच अनुत्तरच का? आज सर्वसामान्य जनतेचे जीवन अस्थव्यस्थ झाले.कुठल्याच प्रकारचे समाधान नाही.याचा शोध घेताना मात्र सरकारच्या धेयधोरणाचा, नियमांचा विचार न करता आपल्या नशिबाच्या नावाने खापर फोडून कंगाल होणारी जनता कुण्या कंगना,सुशांतच्या वातावरणात आपण सुरक्षित आहोत यात समाधान व्यक्त करते. अशाप्रकारची भारतीय समाजाची मानसिकता झाली आहे. यातूनच काही जाणकार वर्गातून या साऱ्या प्रकाराला कमालीचा विरोध दर्शिवला जात आहे.ही उफळी दिवसेंदिवस वाढत जाण्याचे संकेत  आजच्या परिस्थितीत  स्पष्ट दिसत आहेत.कारण ज्या प्रकारे भारतीय जनता पक्ष आपले राजकारण ज्या खालच्या स्थरातून करत आहे ,त्याला पक्षातीलच काहीजण विरोध करत आहेत व आपल्याच पक्ष्याच्या धोरणाविषयी घरचा आहेर बहाल करत आहेत.कारण या सगळ्या प्रकाराची पार्श्वभूमी बघितली तर अत्यंत भयावह आहे.तो म्हणजे कालचे बेरोजगारीचे उदाहरण  ज्या असंतोषातून देशातील तरुणांनी थाळ्या,घंटा वाजवून आपला रोष व्यक्त केला कारण म्हणजे गेली पंचेचाळीस वर्ष जो बरोजगरीचा दर कधी वाढला नव्हता तो या दशकात वाढला.वित्त वर्ष २०१७-१८या काळामध्ये १००व्यक्तिमधून ६.१व्यक्ती बेरोगार होता.संपूर्ण देशात ६.२% बेरोजगारी होती तर त्यात महिला बेरोजगारीचे प्रमाण५.७%होते.शहरी भागातील पुरुषांची बेरोजगारी दर ग्रामीण  पेक्षा ५.८च्यातुलनेत  ७.१% होती. फेब्रुवारी २०१९ महिन्यात देशात ७.८% झाली. आजच्या करोनाच्या काळात तर २४ मे २०२०च्या सेंटर ऑफ मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी च्या रिपोर्ट नुसार भारतीय बेरोजगारी दर २४.४% नोंद करण्यात आली.तसेच दुसरी बाब म्हणजे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार २०१८च्या या एका वर्षात तब्बल १० हजार ३४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यामध्ये सर्वाधिक आत्महत्येचे प्रमाण महाराष्ट्रात ३ हजार ५९४ होते.भारतात १२.५६ कोटी माध्यम व छोटे शेतकरी आहेत.त्यांच्याकडे जास्तीत जास्त दोन हेक्टर जमीन आहे. सरासरी शेतकऱ्यांचा खर्च दोन हेक्टरसाठी १० हजार रुपये येतो. उत्पन्नाच्या बाबतीत २०,४०० रुपये पदरात पडत असताना म्हणजेच वर्षाला १०हजार रुपये खर्च करण्यासाठी मिळतात यातच शिक्षण,आरोग्य,लग्न,सण,करमणूक, इत्यादी करावे लागते. रिझर्व बँकेच्या आकडेवारी नुसार १२ कोटी शेतकऱ्यांपैकी  सरकारी बँकांत  ५ कोटी  शेतकऱ्यांची सरकारी  बँकांत खाते आहेत. ३०% शेतकरी खाजगी ,महाग कर्ज घेतात.तर अर्ध्यापेक्षा अधिक शेतकरी कर्जबाजारी आहेत. २००१-२०२० या २० वर्षांत महाराष्ट्रामध्ये ६०हजार शेतकरी आत्महत्या झाल्या. गेली १० वर्षात दररोज १० शेतकरी मृत्यूला कवटाळत होता.१९९५ ते २०१३ या वर्षात देशात दोन लाख ९६ हजार ४३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सापडते.अशाप्रकारच्या आर्थिक आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी हतबल आहे.या सगळ्या प्रकाराचा परिणाम असंतोषास जन्म देणारा ठरेल.दुसरी बाजू म्हणजेच ज्या घटनेतून भारतीय समाज व्यवस्थेचे इथल्या गल्लीछ राजकारणाचा असली मुखवटा उघडकीस आणणारा आहे, अशा मॉब लिंचिंग,दंगली दरम्यान बलात्काराच्या घटना, गोवंश हत्याबंदी कायदा,पत्रकारांवरील हल्ले, माहिती अधिकार कार्यकर्त्यावरील हल्ले,आदी महत्वपूर्ण आकडेवारी  मात्र लपवली गेली आहे. तसेच आता दिवसेंदिवस खाजगीकरण बळावत चाललेले आहे.ज्या प्रसार माध्यमातून लोकशाहीचे संरक्षण करणे गरजेचे असते तीच प्रसार माध्यमे लोकशाहीचा आवाज होण्याऐवजी दाबण्याचे काम करू लागली.ज्या लोकप्रतिनिधींना भारतीय जनता आपल्या सामाजिक सुरक्षेसाठी,विकास आणि कल्याणासाठी निवडून देतात ते प्रतिनिधी जनतेची बात करत नाहीत तर पक्षनिष्ट व खुर्चीनिष्टा वाचवण्यासाठी काहीही करायला तयार आहेत.मग सामान्य माणसाच्या सामाजिक न्यायाचे काय? शासकीय ध्येयधोरणे चुकीची राबवून जी सामान्य माणसाची सर्व प्रकारचे कोंडी करत आहेत ती कोंडी एक दिवस फुटू शकतेच.आज भारतीय अर्थव्यवस्थेचे जे गहन कंबरडे मोडले ते खूप खोलात जाऊन भातात कर्जाचा डोंगर उभा राहील ही जी माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा जो अभ्यास आहे तो तितकाच सत्य आहे. त्यात करोनाने विळखा घातल्यावर पुन्हा चिंताजनक परिस्थि तोंडासमोर आल्याने आज देशात असंतोषाचे वारे वाहत आहे हे मात्र नक्कीच..!
   




   



--मनोहर सोनकांबळे,नांदेड
   ८८०६०२५१५०
Email---manoharsonkamble 255@gmail.com



____________________________





Changing India in the form of dissatisfaction ...




 The people, the governance, the goals, the science, the technology, the law and order are important in the formation of any nation.  No one, religion, creed, party or anything else is particularly important. But in the last few decades, radical changes have taken place in the Indian social system. But the social justice of those changes is still backward.  By taking such a person away from social justice, they are also turning a blind eye to what is going on in the country.  Therefore, in nation building, it is not just a matter of developing technology, it is a matter of raising capitalism.  What was created? This too had to be taken into account in the social change till date.  But it has not been given. This type has been created in all sectors today, increasing unemployment and various social, economic, political, educational issues created by unemployment in the country today.  During this bicentennial reign, big announcements were made through the Indian media and political agenda. With the help of privatization, the source of income growth in the country was limited to capitalists, elites, industrialists, industrialists. This was the only wave in the country. Religions, temples, mosques, agitations  Social insensitivity. Every day the media hides its face from the main question, but those issues are not suppressed. The stomach question remains suppressed until he is hungry.  Mental slavery can be distracting and pain can be hidden but not pain. The Indian people are grappling with a myriad of such issues and instead of implementing policies to address the issue, the government is carrying out a 15-day propaganda campaign highlighting various issues.  So in a few days an atmosphere is being created at the national level on that issue.  This has been going on for the last several days and it has become unattractive for the people to watch the news and debates on the news channels.  Is kind of cheating.  Today, the same thing is happening in the case of Corona, and many ways of playing with human life to get money, bills, grants from different inhumane ways are being revealed. Yesterday, the unemployed youth of the country asked the government to provide jobs and employment.  It is noteworthy that the number of agitations and marches that have taken place in this decade has never been so high except for the Indian independence movement.  The matter came to light again that the agitators were attacked, beaten and beaten up by many agitators.  And why did it happen? Why is it that the citizens do not have the right to make demands, to fight for their rights, to fight for their right to justice, or to protest?  Today, the life of the common people has become chaotic. There is no satisfaction. While searching for this, the people who are getting poorer in the name of their destiny without considering the goals and policies of the government, express satisfaction that we are safe in the environment of Kunya Kangana, Sushant.  This is the mentality of Indian society.  This is why some of the intelligentsia are strongly opposed to all this. There are clear signs of this boom in today's situation.  This is an example of yesterday's unemployment from which the youth of the country expressed their anger by ringing bells and whistles because the unemployment rate which has never increased in the last forty five years has increased in this decade.  In the year 2017-18, 6.1 out of 100 persons were unemployed. The unemployment rate in the country as a whole was 6.2% while the female unemployment rate was 5.7%.  In February 2019, it was 7.8% in the country.  As of today, according to the report of the Center of Monitoring Indian Economy dated 24 May 2020, the Indian unemployment rate was recorded at 24.4%.  There are 3,594 in Maharashtra. There are 12.56 crore medium and small farmers in India. They have a maximum of two hectares of land.  The average farmer spends Rs. 10,000 for two hectares.  While Rs. 20,400 is falling in terms of income, which means Rs. 10,000 per year to be spent, this includes education, health, marriage, festivals, entertainment, etc.  According to the Reserve Bank, out of 12 crore farmers, 5 crore farmers have accounts in government banks.  30% of farmers take private, expensive loans. More than half of the farmers are in debt.  In the 20 years 2001-2020, 60,000 farmers committed suicide in Maharashtra.  In the last 10 years, 10 farmers were dying every day. Between 1995 and 2013, 2,96,438 farmers committed suicide in the country. A farmer in such financial straits is helpless to meet his basic needs. All this will lead to dissatisfaction.  However, important facts such as mob lynching, rape during riots, ban on cattle slaughter, attacks on journalists, attacks on RTI activists, etc., have been hidden.  Also, privatization is on the rise day by day. The media, which is supposed to protect democracy, has become the voice of democracy instead of the voice of democracy. The people's representatives elected by the Indian people for their social security, development and welfare  They are ready to do anything to save it. So what about the social justice of the common man?  All sorts of conundrums that the common man is embroiled in by misappropriating government goals may one day break.  Of course, the winds of discontent are blowing in the country today as the worrisome situation came to the fore again after Corona got involved in it ..!






 --Manohar Sonkamble, Nanded

 8806025150

 Email --- manoharsonkamble 255@gmail.com






टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

Atram Buddhewad म्हणाले…
लेख वाचला. मी जुलै 2017 पासून विद्यापीठाचा भाग आहे. पण आज पाहिल्यांदा असा लेख विद्यापीठाच्या आवारात लिहिलेला पाहिला, आणि वाचला. धन्यवाद!

बुद्धिजीविंची सामाजिक भूमिका कोणती असावी यावर इटालियन निओ मार्क्ससिस्ट अंतोनियो ग्राम्शी (Antonio Gramsci १८९१- १९३७) हे त्यांच्या "The Formation of the intellectuals" या निबंधात सांगतात की, सत्ता ही हिंसेने किंवा दबावाने निर्माण होत नसते, जरी हिंसेचा जोरावर सत्ता निर्माण झाली, तरी ती टिकण्याची शास्वती नसते. म्हणून सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी वर्गाकडून वैचारीक राज्य संस्थांचा उपयोग करून सत्ता ही संमतीतून वा स्वीकृतीतून मिळवली जाते. आणि ही स्वीकृती फॅसिझमला जन्म देते असते. म्हणून बुद्धिजीवींनी छुप्या राजकीय हेतू असलेल्या स्वीकृतीचे स्वायत्तता मोडून काढनारे लिखाण केले पाहीजे. पुढे ग्राम्सी म्हणतो त्या प्रमाणे 'All men are intellectuals but not all men have in society the function of intellectual' हे शेवटचं वाक्य महत्वाचं आहे.

बुद्धिजीवींचे (लेखकांचे) कोणते दायित्व असते हे जाणून घेण्यासाठी खलील निबंध अवश्य वाचा
1) Writers and Leviathan (1948) By George Orwell
2) Why I Write?(1946) George Orwell
3) The Responsibility of Intellectuals (1967) Noam Chomsky
4) Writers and Intellectual Responsibility (1996) Noam Chomsky
5) Ideology and Ideological State Apparatuses - Louis Althusser
6) The death of A Author - Roland Barthes
7) Whai is an Author? - Michael Foucault
SAWAL MAZA.blogspot म्हणाले…
खूप मार्मिक विश्लेषण
Ashok म्हणाले…
एक वास्तववादी पत्रकारितेला आपल्या रुपाने नव्या समाजामध्ये उदय होऊ पाहत आहे हा एक आंबेडकरवादी आणि लोकशाहीवादी मूल्यांची जोपासना करणारा एक नवा सूर्योदय होत आहे याचा मनापासून खूप आनंद होत आहे. एक मातीत स्वतःला पेरून घेऊन समाजाचे वास्तव मांडणारा एक बहुआयामी लेखक उभा होतोय याचे मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो .धन्यवाद पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा। अशोक सदावर्ते वसमत जिल्हा हिंगोली 99 21 39 85 35