Header Ads Widget

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

स्वराज्याच्या कृषिव्यवस्थेवर भांडवलदाऱ्यांचा डाव; एक शिवचिंतन!

स्वराज्याच्या कृषिव्यवस्थेवर  भांडवलदाऱ्यांचा डाव;  एक शिवचिंतन!







ज्या मातीतुन उपजणाऱ्या भाकरीने आणि त्यासाठी श्रम वेचणाऱ्या श्रमिकांने कधी नफेखोरीची आखणी केली ना कधी हिसाब केला. आजवर चालणारे ते कष्ट कधी दमले नाही.ते असेच निरंतर चालू आहेत. त्यातील गमक म्हणजे स्वराज्य.कारण स्वराज्यात कोणी एकटा मालक नाही ना कोणी गुलाम.स्वराज्यात अगोदर माणसांची भूक भागवली जाते. भाकरीचा हिसाब नंतर केला जातो.पण काळ बदलला तसी लोक बदलली.  तंत्रज्ञान आले .तंत्रज्ञानातून भांडवलदार उदयास आला.भांडवलंदाराने  नफेखोरी चालू केली. नीतिशास्त्र धुळीस पडले. आणि सुरु झाली ती  शोषणव्यवस्था.पण स्वराज्यात शोषणाव्यवस्था नसतेच. आणि ज्यात शोषणाव्यवस्था असते ते स्वराज्य नसते.शिवछत्रपतीने ज्या  स्वराज्याची निर्मिती केली त्यातील शेतकरी आणि  आज देशातील शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेता स्वराज्यातील शेतकऱ्यांवर आलेलं गडांतर वाटते.स्वराज्याच्या मातीत कृषिसंपन्नतेला प्रामाणिकपणे न्याय मिळत होता. त्या काळातील कृषक हा सार्वभौम होता.कृषिव्यवस्था ही शेतकऱ्यास कधी ओझी वाटली नाही. ना कधी कुण्या कृषकाणे कृषीसंदर्भातून आत्महत्या केली.ना कृषक कधी भाकरीसाठी मोताज झाला. ना कधी त्यावर कुठली अमानुषता ओढली गेली.तो जगला तो त्याच राज्यासारखा  ज्या राजानी त्याला स्वराज्य बहाल केलं.आजच्या घडीला मात्र याच्यापेक्षा अधिकच विरुद्धचक्र आजच्या तमाम शेतकरी,श्रमिक,शेतमजूर आणि सर्व दुर्लक्षित घटकांच्या भोवताल घोंगावत आहे.त्याचं कारण म्हणजे   शिवरायांच्या स्वराज्यातील कृषीधोरणे हे सर्वसमावेशी न्यायिक होते.तर आजची कृषिधोरने ही भांडवलदार समावेशी आहेत.ज्यात स्वतः कृषकापासून ते शेतमजूर,श्रमिक,वंचित,गरीब,दुर्लक्षित घटक हे सर्व भांडवादारशाहीच्या नजरेतून गुलामच.पण गुलामांना जर गुलामीची जाणीव होऊ लागली तर गुलामित्व लादनाऱ्यांचे अस्तित्व मिटवत असतात हा आजवरचा अटळ इतिहास आहे. आणि आज तोच इतिहास देशाच्या राजधणीतून घडवताना शिवरायांच्या कृषिव्यवस्थेचं चिंतन होणे निकडीचे ठरते.ज्या अर्थी कृषक आणि कृषिव्यवस्था डबघाईला अली आहे.

त्याच्या कारणांची मीमांसा केली असता.कृषिक्षेत्रात  वाढत जाणारा भांडवलंदारांचा भडिमार होय.कृषी व्यवस्था ही अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते.पण ज्या पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला येते त्यावेळी जो प्रकार सेवा क्षेत्र,उद्योग,व्यवसायास आधार देण्यासाठी सर्व हात सरसावतात.पण तोच प्रकार कृषिक्षेत्राच्या बाबतीत घडत नाही.या पध्दतीला भांडवलधार्जिनी शासनव्यवस्था म्हणता येईल.कुळवाडी भूषण  छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या कृषिनीतीचा आणि आजच्या कृषिधोरणांचा विचार केला असता.कमालीचा विरोधाभास जाणवतो.ज्या पद्धतीने राजांनी कृषिक्षेत्राची महती जाणून आपल्या स्वराज्यात शेतकऱ्यांची काळजीवाहू भूमिका घेतली ती आता दिसत नाही.कारण कुळवाडी भूषण  छत्रपती शिवाजी महाराज कृषिनीती संदर्भात इतके संवेदनशील होते की, त्यांनी कृषिक्षेत्राचा खोलात जाऊन आखणी केली. कृषकाला ,रयतेला,श्रमिकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा असा राजा अन्य कुणी सापडणार नाही. याबाबतीत ते नेहमी  दक्ष असत.  १६६२मध्ये  जेव्हा राजेंना  शत्रू आपल्याकडे चाल करून येणार आहेत हे समजते तेव्हा ते  अतिशय काळजीने आपल्या रयतेची,शेतकऱ्यांची ,श्रमिकांची सुरक्षितता याला प्राधान्यक्रम देतात .त्यासाठी सर्जेराव यांना लिहलेल्या  पत्रात राजे म्हणतात की,"तुमच्या इलाख्यात मोगलांची फौज येत असल्याची वार्ता हेरांनी दिली.त्यामुळे एलाख्यातील सर्व रयतेला ,लेकराबाळासह घाटाखाली सुरक्षित जागा असेल तिथे पाठवावे.या कामात हयगय करू नये.या कामात हयगय कराल तर तुमच्या माथी रयतेचे पाप लागेल.इतके संवेदी व रयतेची काळजी वाहणाऱ्या स्वराज्यात अर्थात रयतेच्या या देशात गेली दोन महिन्यांपासून स्वतःच्या मानेवरील कृषिबिलाच विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची आजची अवस्था पाहून मन उद्विग्न होते. शिवाजी महाराजांनी केलेल्या लढाया या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून केल्या न्हवत्या तर शेतकरी हिताच्या होत्या. त्याच स्वराज्याच्या आजच्या परिस्थिती शेतकऱ्यांना नामशेष करून भांडवलंदारांना पोसण्याचे धोरण शासनस्थरावरून राबवण्यात येत आहे. देशातील सर्व शेतकरी ज्या प्रकारातून सरकारच्या कृषिबिलाचा विरोध करत आहेत ,त्यासाठी त्यांची होणारी बिभत्सना म्हणजे सरकारकडून चालवलेला आसूड होय.अशा या आजच्या दांभिक दर्शनाच्या सरकारी भूमिकेचा न्याय खोटा वाटतो.

कारण शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने आपल्या अज्ञापत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी कसे वागावे याचे नीतिशास्त्र सांगता. ते असे की,१६७३रोजी चिपळूण येथील जुमलेदार, हवालदार,आणि कारकुनाना पाठवलेल्या पत्रात म्हणतात, "जनावरांचा चारा काटकसरीने वापरा, चाऱ्याची उधळण कराल तर पावसाळ्यात जनावरांना उपास पडेल.घोडी मरायला लागतील.मग तुम्ही कुणब्याकडून(शेतकऱ्यांकडून)धान्य,भाकरी,गवत,फांद्या,भाजीपाला आणाल, मग शेतकरी उपाशी मरेल, ते निघून जातील आणि म्हणतील तुम्ही तर मोगलापेक्षा अधिक जुलमी आहात. शेतकऱ्यांचा तळतळाट लागेल,त्यामुळे शेतकऱ्यास त्रास देऊ नका, तुम्हाला गवत ,धान्य ,भाजीपाला ,लाकूड हवे असेल तर बाजारातून योग्य मोबदला देऊन घेऊन आणावा, कोणाकडून जुलुम अथवा अन्याय अत्याचार वा भांडण करून घेऊ नका, शेतकऱ्यांना त्रास देऊ नका" अशा सूचना राजेंनी केल्या होत्या.

शेतकऱ्यास काडीचाही त्रास न देणाऱ्या स्वराज्यातील आजच्या परिस्थितीतील शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे रोवण्याचे प्रकार चालू आहेत. जुलूम आणि अन्याय  अत्याचाराला थारा न  देणाऱ्या स्वराज्यात आज शेतकऱ्यावर अमानुषतेचा रोष शेतकऱ्यावर लादला जात आहे. म्हणून आजच्या स्वराज्यात ज्या धोरणांची बांधणी केली जात आहे.ती धोरणे हे शेतकरी हिताचे नसून भांडवलदारी व्यवस्थेला खतपाणी घालणारी आहेत. स्वराज्यात जनता सार्वभौम असते पण सरकार  ज्या पद्धतीने दडपशाहीने जनतेचे सार्वभौमत्व नाहीसे करत आहे ते  कृषिव्यवस्थेच्या नैतिक पटलावर स्वराज्य संकल्पनेला छेद देणारे आहे.मागील काही वर्षातील देशातील शेतकरी  आत्महत्येचे प्रमाण  लक्षता घेता देशात  सन २०१८ मध्ये १०हजार ३४९ आत्महत्या केल्या. नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डस् ने जाहीर केलेल्या अहवाहलात २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.त्यात महाराष्ट्र अग्रेसर होता. २०१७ ची आकडेवारी  १० हजार २४१ एवढी होती.२०१८मध्ये ७७६३शेतकरी आत्महत्या झाल्या तर त्यात ४५८६ शेतमजूर होते.५४५७पुरुष होते तर ३०६स्त्रीया. या सगळ्या आत्महत्या होण्यामागची कारणांचा शोध घेतला असता.शेतमालाला हमीभाव नसणे,नैसर्गिक संकटे,कृषी संकटे हीच शेतकरी आत्महत्येची कारणे होती.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक मोठमोठी कृषी संकटे अली पण एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. आज देशात ज्या कृषिव्यवस्थेला  भांडवलदारांच्या पायदळी घालण्याचा घाट रचला जात आहे.त्यातून शेतकऱ्याला पुन्हा देशधोडिस  लावणारी आजची परिस्थिती  लक्षात घेता भांडवलदाराच्या अधीन होत जाणाऱ्या  कृषीधोरणांच्या निमित्ताने शिवरायांच्या कृषिनीतीचा स्वीकार  होणे गरजेचे आहे.तरच या  शेतकऱ्यांची  समस्यातून मुक्ती होईल.अन्यथा भांडवलंदारांचा एक मोठा डाव या कृषिव्यवस्थेला गिळंकृत करण्यासाठी टपून बसला हे निश्चित. शिवजन्मोत्सवाच्या निमीत्ताने आजच्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात एक शिवचंतन  उद्याच्या समृद्ध कृषीव्यवस्थेसाठी !सर्वांना शिवजंतीच्या हार्दिक शुभेच्छा

                                                                                                             (   मनोहर सोनकांबळे

            ८८०६०२५१५०

             manoharsonkamble       255@gmail.com

स्कुल ऑफ मीडिया स्टडीज

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

Nsosyf,blogspot.com म्हणाले…
खुप सुंदर इतिहास आणि वर्तमान शेतकरी त्यांची धोरणे,हे सर्व काही कमी शब्दात मांडले

Unknown म्हणाले…
खूप छान माहिती आहे
Anurag म्हणाले…
सामाजिक परिस्थितीचा अचुक वेध.... धन्यवाद सर