Sense india foundation सिनेसृष्टीतील करिअरचा विश्वासहार्य पाठीराखा
सिनेमा हा परिवर्तनाचा माध्यमातील एक महत्वाचा भाग आहे. पण सिनेमे तशी निर्माण झाली पाहिजे.सिनेमातून केवळ मनोरंजनच नको तर संदेश महत्वाचा ठरते.सिनेमा आणि मानवी जीवन यातील फक्त पडद्याचा अंतर बाजूला सारला तर ते आपलं जगणंच असत. मानवाचा संघर्ष हा जगण्याचा आहे.अधिराज्य ,वर्चस्व प्रस्थापित करण्याचा आहे.याच मनासिकतेतून उदयास आलेली वर्णव्यवस्था ,वर्गव्यवस्था ही मानवी समस्येचं मूळ बनली आहे. अशाच या वर्णवादी व्यवस्थेच्या विरोधात लढून आपलं अस्तित्व टिकवू पाहणाऱ्या मानवी समुदायाचे प्रत्येक प्रयत्न खोडनाऱ्या या लढाईत प्रत्येकाचे जीवन , संघर्ष, प्रश्न हे भिन्न आढळतात. अशाच व्यवस्थेत काही जगणे ही मानव निर्मित असतात.त्यात शोषणकारी व्यवस्थेने छळलेले,नाडून पाहिलेले,संधी नाकारलेले,हीन लेखलेले, ह्या बाबी प्रकर्षाने जाणवतात. आशा मानवी वेदनांच्या जगण्याला जगासमोर मांडत असतांना सिनेमा खूप अर्थपूर्ण ठरू शकतो. पण शोषणकर्ते शोषितांचे शोषण,दुःख,वेदना दाखवणार नाहीत. अशा व्यवस्थेत सिनेसृष्टीक्षेत्रात शोषितांना वाव मिळणे आवश्यक ठरते. कारण सिनेमा हा मानवी समुदायाचा प्रतिबिंब असतो. अनूपम ओझा याबद्दल म्हणतात की ,"चित्रपट एक असे माध्यम आहे की ज्यात सर्व संलग्न कलांचा समावेश होतो".अशा सर्व एकत्रित कलांचा संयोग होऊन विविध व्यक्तीच्या विविधांगी कला एकत्र येऊन जी कलाकृती बनते ,त्या सिनेमाचे जग आज काळाच्या ओघात जलद गतीने विस्तारतत आहे.यापूर्वी काही दशकात सिनेमा हे गरीब सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या कलांना वाव भेटणे म्हणजे अतिशय विरळ बाब होती. पण दिवसें दिवस या क्षेत्राच्या दिशा विस्तारत गेल्या. तसतशी त्यात नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश वाढु लागला. तंत्रज्ञानामुळे व व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या कला गुणांची कदर करणाऱ्या छोट्या-मोठ्या सिनेमा निर्मितीच्या जाणकारांनी सिनेमा निर्मितीच्या शोधात विशिष्ट जात समूह, वर्ग समूह, व्यक्ती समूह ,यांची असणारी मक्तेदारी काहीशी खोडून काढली; आणि इथल्या व्यवस्थेत कलागुणांनी संपन्न गरीब ,वंचित, मागासवर्गीय ,तरुण पिढी जसजशी संघर्ष करत सिनेमाचे दार थोठावित स्वतःला त्यात प्रभावी ठरवू लागली. तस-तशी काहीसे उमेदीच्या अशा आता सिनेसृष्टीच्या उंबरवठ्यावर पल्लवीत होऊ लागली. तरीही आजही या क्षेत्रात प्रचंड मक्तेदारी, ओढातान, स्पर्धा ,संधी देणे व संधी न देणे या आदमखोर वृत्तीना खतपाणी घातलं जातं. अशा अवस्थेत गेली २४ वर्षांपासून अविरत नवख्या तरुणांना त्यांच्यातील कलाविष्कारात ऊर्जेची भर ग घालून त्यांच्यातील सखोल कलेला समतोल मार्गदर्शन करत सिनेमानिर्मितीच्या वाटा खुली करून देण्याचा प्रयत्न सेन्स इंडिया फौंडेशन अविरत करत आहे. अत्त दिप भव् हा मूलमंत्र जपत आजवरच्या हजारो तरुणांना करिअर , नाव, लौकिक ,अर्थप्राप्ती आणि मोठं व्यासपीठ निर्माण करून देणारे हे सिनेमा इन्स्टिट्यूट सेन्स इंडिया फौंडेशन दिवसेंदिवस तरुणांना खुणावत आहे.
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणारे हे इन्स्टिट्युट संशोधनास प्राधान्य देते. अनेक चित्रपट निर्मिती ,लघुपट निर्मिती ,कथा ,पटकथा लेखनाची तंत्रे, दिग्दर्शक निर्माता पासून ते विविध प्रकारच्या सामायिक मासिक दोन वर्ष सर्टिफिकेट कोर्स डिप्लोमा हे सारं काही प्रशिक्षण , प्रत्यक्ष प्रात्यक्षिक ,उत्तम तंत्रज्ञानाचा वापर ,ओळख ,नामवंत सिनेमा सृष्टीतील आमंत्रित केलेली विविध मार्गदर्शक यांच्या अनुभवांची सांगड विद्यार्थ्यांच्या जीवनात उतरवण्याच काम संचालक बापू सर्वगोड करत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात कसली शंका-कुशंका न राहू देता प्रत्येक विद्यार्थ्यांना व्यक्तिगत लक्ष नोट्स स्टडी मटेरियल पुरवणे, सराव करून घेणे, या सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस बहर घेताना घेत असतानाच आज त्याच आणखीन एका गोष्टीची भर पडली. ती म्हणजे काळानुसार बदलांचा परिणाम लक्षात घेता या इन्स्टिट्यूटने एक ॲप लॉन्च केलं ज्याचं नाव म्हणजे सेन्स इंडिया फाउंडेशन.या अप्सचं वैशिष्ट्य म्हणजे यातून आपणास कथा, पठकथा लेखन ,कादंबरी स्टोरी डेव्हलोपमेंट यासारखे स्किल घरीबसूनही शिकता येतात.हे ऍप्स डाऊनलोड करून इथली वर्कशॉप अटेंड करतानाची प्रक्रिया अगदी सोपी सिम्पल आहे.माफक फीसची सोपी पद्धत .आपली उपस्थिती . स्टडी मटेरियल या सगळ्या अगदी हातात आल्या आहेत.
नुकताच अप्सची निर्मिती झालेला हा अनुभव बरच काही शिकवतो.व याक्षेत्रातील कठीण चित्र मिटवतो. त्यामुळे त्यांचा हा प्रयोग संपूर्ण देशभरात उपयोगास आणण्यात हरकत नाही.
फटीआयआय मधून पदव्युत्तर पदवीचे प्रशिक्षण घेतले बापू सर्वगोड हे पठकथेतील व्यासंगी तज्ञ आहेत.समाजाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन हा न्यायिक आहे. त्यांनी भारतातील देवदासी कस्टमरवर आधारित काही डाक्युमेंटरी फिल्म्स आणि फिचर फिल्म्सचे लेखन आणि दिग्दर्शन केले. त्यापैकी देवदासी संदर्भात होली बस्टर्ड . तर भारतातील सामाजिक -राजिक्य विषयावर आधारित ऑडिट हिंदी फिचर फिल्मचे लेखन दिग्दर्शन केले. अशा अनेक चित्रपटांना त्यांनी हात घातला.सोबतच विविध चित्रपट प्रकल्पाचे ते सल्लागार म्हणून काम करत आहेत. त्यांचा पिंड चित्रपट निर्मिती आणि संशोधन हा मुख्य प्रवाह आहे.सेन्स इंडिया फौंडेशनने २००२पासून फिल्म मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करत आलेले आहेत. त्यात जवळपास १२००वर्कशॉप पूर्ण झाली आहेत .७५फिल्म चित्रपट निर्मिती, विश्लेषणसह प्रयोग ह्या गोष्टीसह दिवसेंदिवस सेन्स इंडिया प्रगतीच्या शिखरावर वाटचाल करत आहे. यात महत्त्वाची बाब आपल्यासमोर आणली ती म्हणजे यातील कोर्स जसे कथा पटकथा लेखन हे कोर्स आपण सहज आणि उत्तम प्रकारे शिकू शकतो त्यासाठी लागणारी प्रक्रिया खूप सोपी आणि साधी विशेषत विश्वासहारी आहे. या सर्व स्तरातून यशाच्या परिसीमा ओलांडून जाणाऱ्या सेन्स इंडिया फौंडेशन रिसर्च अंड एज्युकेशन फोरमचे अभिनंदन आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती कार्य अशीच गरुडझेपी ठरावी यासाठी सहृदयी शुभेच्छा! आपल्या संस्थेकडून असेच तळागाळातील शोषित व्यक्तीच्या कलेचा शोध घेऊन त्याचा पाठीराखा बनावे या आशावादासह ..
(टीप:अधिकच्या संपूर्ण माहितीसाठी सेन्स इंडिया फौंडेशन ,रिसर्च अँड एज्युकेशन फोरम ला site ला भेट द्या किंवा ऍप्स डाऊनलोड करा https://treeloki.page.link/cmhd)
- मनोहर सोनकांबळे
एमफिल संशोधक विद्यार्थी
( स्कूल ऑफ मीडिया स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड
-88060250150
manoharsonkamble255@gmail.com)




0 टिप्पण्या