Header Ads Widget

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

लव्ह जिहाद धर्माच्या कोंडीत अडकलेली सल !

                                               
                                    
 लव्ह जिहाद धर्माच्या कोंडीत अडकलेली सल !







 प्रेम म्हणजे प्रेम असते।
 तुमचे आमचे सेम असते।।
या कवी मंगेश पाडगावकर त्यांच्या ओळी प्रेमाच्या  दुनियेतील अंतर मिटवणाऱ्या आहेत. पण हल्ली प्रेम सेम राहील नाही.प्रेमाला जात ,धर्म, भाषा, पंथ याची लागण झाली. प्रेमाच्या दुनियेतील नाना रंग ढंग वेगळेच.मात्र प्रेमात धर्म सामील झाला की,माणूस पशु होऊ लागला तर धर्म काय कामाचा?धर्मासाठी माणूस कीं माणसासाठी धर्म याची चिकित्सा न करता प्रेमाच्या जीवावर आज धर्म उठला आहे हे तेवढंच सत्य.खरे तर प्रेम ही भावना नैसर्गिक .जोपर्यंत त्यात नैसर्गिकता आहे तोपर्यंत ठीक .पण नैसर्गिकता संपली की माणसातला पशु जागा होऊ लागला. पशु वासनांध नसावा माणूस मात्र वासनांध.कारण माणसाला दिवसेंदिवस जात,धर्माची  नव्याने लागण होऊ लागते तसे त्याचे नैसर्गिक प्रेम संपते.धर्माच्या बेड्या डोक्यात अडकवल्या कीं धर्मयुद्धाचे स्फुरण पेटते.जवळपास २००७ मध्ये केरळ,कर्नाटक प्रांतातून अजतागत वाऱ्यागत फोफावणारा आणि परिणामी धर्मयुद्धाच्या आखाड्यावर घोंघावणारा शब्द म्हणणे "लव्ह जिहाद"याच लव्ह जिहाद बद्दल अनेकांच्या मनात मत मतांतरे असतील.त्यातील काही सकारात्मक तर काही नकारात्मक असू शकतील.पण धर्मापेक्षा माणूस मोठा यात समाधान मानून लव्ह जिहाद मधील विष पेरणे बंद झाले पाहिजे.कारण साखर गोड असली तरी त्यात विष कालवल्यास प्राण जाणारच.म्हणून ज्या अफवा ,क्रोध दुसऱ्या धर्माबद्दल इर्षा मनात बाळगून जी कृती केली जाते ती निंदयानीचच.आज अशी असंख्य कृत्य भारतीय समाजव्यवस्थेत वाढताना दिसत आहेत.कारण धर्माची शिकवण वेगळी आणि धर्माच्या ठेकेदाराकडून दिली जाणारी शिकवण वेगळीच असते.ती अनुसरण्यात माणूस नेहमीच गल्लत करतो.विध्वंश,संहार याला विजयात तोलू नये.कारण विध्वंश तो विध्वंशच. त्याच प्रमाणे माणूस तो मानूनच माणसाला जात धर्मात तोलनेही अयोग्यच.पण भारतासारख्या सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या देशात धर्माइतका मोठा धंदा अन्य कोणता नाही. धर्माच्या या धंद्यात देशातील अर्थव्यवस्था हालू शकते आणि मजबूतही होऊ शकते.देशातीचे दरडोही उत्पन्न एकीकडे आणि धर्माच्या धंद्यातील उत्पन्न यात धर्माचे पारडे जड भरेल.कारण धर्म राजकारणात चालतो.धर्म समाजकार्यात,शिक्षणात, समाजात, गल्लीत ,मोहल्यात, राहण्यात ,बोलण्यात, न्यायात , अन्यायात , जगण्यात,नोकरी,गरिबी, श्रीमंती, पोट भरण्यात ,उपाशी राहण्यात या सगळ्या बाबबीत धर्म चालतो.हाच धर्म जेव्हा प्रेमासारख्या नाजूक नात्यात प्रवेश करतो.तेव्हा नैसर्गिक प्रेमवृत्ती,भावना,माणूसपण वेगळ करतो.प्रेमाला बंदीस्त करता येत नाही. ते कुणावर बळेंच लादता येत नाही.गरीब-श्रीमंती,उच्च- नीच,हा भेद त्यास अमान्य.मात्र यात धर्माचा शिरकाव झाला की सगळेच मान्य करावे लागणार.अशीच आज धर्माच्या शिरकावातून पुढे आलेली बाब म्हणजे लव्ह जिहाद.त्यामुळे लव्ह जिहादच्या नावावर क्रूरता निर्माण झाली त्यातील वास्तव समजून घेणे गरजेचे आहे. कारण ज्या पद्धतीने समाज माध्यमापासून ते मुख्य धारेच्या माध्यमातून यावर चर्चा घडून येत आहे.लव्ह म्हणजे प्रेम . याच प्रेमासमोर जिहाद शब्द जोडून समाजामध्ये लव्ह जिहादच्या नावाने  क्रूरता बिंबवुन पक्षीय राजकारनाची घडी सैल केली जाते.अशा वेळेस समाजाने तर्कवादी बनले पाहिजे. मुळातच जिहाद हा 'अरबी 'भाषेतील शब्द आहे. जिहाद म्हणजे संघर्ष.जिहाद म्हणजे कोणाचीतरी खून करणे,बेगुन्हेगारास मारणे,छळ करणे असा कोणताही त्याचा अर्थ नसून जिहाद म्हणजे पवित्र कार्य.मात्र इस्लाम विरोधकांनी यात तोडमोड केल्याने यातील सकारात्मक दृष्टीकोन नाहीसे होतात. आणि आमच्या पुढं उभं राहतं ते धर्मयुद्ध.अरबीमध्ये युद्धास  गजवी अथवा मगाजी म्हटलेले आहे.पण युद्धास कधी जिहाद म्हटले नाही.या उलट जिहाद म्हणजे संघर्ष करणे,जिहाद म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढणे,जिहाद म्हणजे सत्यासाठी प्राणाची बाजी लावणे,जिहाद म्हणजे आई -वडिलांची सेवा करणे,एवढेच नाहीतर जिहाद म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे सुद्धा स्पष्ट केले जाते.पण कुठल्याही अर्थाने जिहादचा अमानवीय अर्थ स्पष्ट होत नाही.
लव्ह जिहाद या शब्दाचा भारतीय कायदा व्यवस्थेत उल्लेख नाही.पण मध्य प्रदेश सरकारने लव्ह जिहाद कायद्याच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आज घडीला उत्तर प्रदेश मध्ये लव्ह  जिहाद प्रकार जास्त वाढत असल्याचेही सांगण्यात येत आहे. भारतीय घटनेने व्यक्तीला व्यक्ती स्वतंत्र, धर्म स्वतंत्र दिले आहे. त्यामुळे कुठलाही कायदा व्यक्तीच्या हक्क अधिकाराचे हणन करू शकत नाही. आज मोठ्या शहरात लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहण्याचे प्रकार वाढत आहेत. मात्र ज्या आधारावर लव्ह जिहादचे वातावरण निर्माण होत आहे.त्या अनुषंगाने धार्मिकवादाचा त्यात भर पडत आहे. मुळातच कुठल्याही धर्मावर त्या धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीवर अन्याय होऊ नये.त्याची फसवूनक होऊ नये. पण यातील वेगळ्या मुद्याला धर्मदोषाचे पेचप्रसंग निर्माण केले जाणे हे निंदयनीयच.हिंदू धर्मातील मुलीसोबत मुस्लिम युवकाने आपल्या प्रेमजाळ्यात फसवून त्या युवतीचे इस्लाममध्ये धर्म परिवर्तन करने,किंवा तिचा जर त्यास विरोध असेल तर तिचा छळ करणे,व अन्य अन्याय ,अत्याचारकारक दुर्व्यवहार करने ह्या बाबी लव्ह जिहाद मध्ये गणल्या जात आहेत.याबाबी कायद्याच्या चौकटीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मुळातच भारतीय स्त्रियांवर जो अन्याय अत्याचार होतो त्यासाठी कायद्यात तरतुदी आहेतच  व महिला संदर्भात विविध प्रकारचे आयोग,समित्या,यांची ढीगभर संख्या असूनही आज महिला कुठल्याच बाबतीत सुरक्षित नाही.मुळातच महिला शोषणाचा विषय वेगळा आहे.व तो सर्व महिलांच्या बाबतीत समान आहे.कुठलीही व्यक्ती आपल्या पसंतीनुसार कुठल्याही धर्माचा जोडीदार निवडू शकते.आणि ज्या पद्धतीने आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह घडून येतात ती बाब माणसाला माणूसधर्म सांगणारी आहे.ज्या स्तरातून अंतर जातीय व अंतर धर्मीय विवाह पार पाडतात ते दाम्पत्ये सुजाण असणे गरजेचे आहे.जो लव्ह जिहादच्या बाबतीत फूस लावून धर्मपरिवर्तन केल्या जात आहे अशी वलग्ना केली जाते. आपणास समोरील व्यक्तीचा धर्म व अन्य बाबतीत गाफील राहणे,बळी पडणे एवढी दूधखुळी जनरेशन आज नाही.प्रेम जात ,धर्म पाहून केलं जात नाही.ज्या समधर्मीय व समजातीय व आप्तस्वकीयांच्या अंतर्गत जी विवाह केली जातात त्यातही बरेच घटस्फोटाचे प्रमाण दिवसें दिवस वाढत आहेत.आणि अत्याचारही होत आहेत अशात कोणता जिहाद जोडावा ?विशेष म्हणजे विशेष विवाह कायदा रद्द केला तर घटनेतील कलम १४ व २१ च उल्लंघन होण्याची बाब आहे.  तरीही यातील धर्माचा आधार घेऊन धार्मिक तेढ निर्माण करण्याचे संकेत आणि मुख्य मुद्यांना वगळणे हे समीकरण आता दिवसें दिवस रूढ होत आहे.त्यामुळे लव्ह जिहाद हे धर्माच्या कोंडीत अडकलेली सलच म्हणता येईल.



       मनोहर सोनकांबळे
   (  एम. फील. संशोधक  विद्यार्थीं
        माध्यमशास्त्र संकुल                           स्वा.रा.ती.म. विद्यापिठ ,                      नांदेड )
         ८८०६०२५१५०
manoharsonkamble255@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

Shankar kardewad म्हणाले…
धर्म ही अफूची गोळी आहे - कार्ल मार्क्स
खूप छान मांडणी👍👍👍
Unknown म्हणाले…
खूपच अभ्यासपूर्ण, चिंतनशील, ज्वलंत परिस्थितीचा हुबेहूब आलेख रेखाटला.. अशा लेखाची आजच्या तरुण पिढीला प्रकरश्याने गरज आहे.. लव्ह जिहाद, हिंदू मुस्लिम.. नावाखाली तरुण पिढीची दिशाभूल करण्याच षडयंत्र या समाजाच्या ठेकेदारानी सुरु केल आहे... खरंच तुमचा लेख म्हणजे अंधारात भरकटनाऱ्या मनुष्य जातीला प्रकाशाची वाट....
तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा,
इन्सान की औलाद हैं इन्सान बनेगा... अभिनंदन.. अशीच प्रगती हो.हो हीच मंगल कामना...