जगाच्या इतिहासात प्रत्येक जीवांच्या बाबतीत संकटाने कधी पाठ सोडली नाही.प्रत्येक जीव इथं आपलं अतित्व टिकवण्याचा प्रयत्न करते.जो आपल्यातील प्रबळता टिकवुन निसर्गातील कालचक्रातील बऱ्या वाईट परिणामाला तोंड देतो तोच इथं टिकतो.आजतागत जगात विविध प्रकारच्या साथी, महामारी,आल्या आहेत.आणि त्यातील परिणामामधून असंख्य प्रकारच्या जीवितहानी,वित्तहानी,वा संकृतीकहानीसुध्दा झाल्यात.आज संपूर्ण विश्व ज्या हाणीच्या परिणामाला समोर जात आहे ते म्हणजे कोव्हिड-१९. फ्रँको बिफो बोरार्डी या इटालियन मार्क्सवादी तत्ववेत्याच करोनाच्या संकटातील मत असे की,"व्हायरस अथवा विषाणू हा शब्द जगाला केंद्रबिंदू ठरला आहे. बोरार्डी या विषाणूने दोन विभाग करतात:पहिला विषाणू म्हणजे कोव्हिड-१९ जो जैविक किंवा भौतिक स्वरूपाचा आहे.आणि दुसरा म्हणजे जैवविषाणूचा मानवी मेंदूवर झालेला परिणाम अर्थातच भीती.याला भाषिक विषाणू म्हटले आहे."सांगण्याचा मुद्दा हाच की. करोना व्हायरसचे विषाणू जेवढे मानवाला अपायकारक ठरत आहेत तेवढीच त्याची भीतीसुद्धा घातक ठरू शकते. भारतासारख्या राष्ट्रात तर योग्य संदेशापेक्षा गैरसमज,भीती,याबाबींचे उधाण वाहते.अमेरिका,रशिया,चीन ,कॅनडा यासारख्या विविध राष्ट्रात लसीच्या चाचण्या यशस्वी ठरत आहेत.जसे की फायबर,बायोएनटेक,कंपन्यांनी मिळून तयार केलेल्या लसीला अमेरिका आणि यूकेमध्ये परवानगी दिली.लसीच्या मोठ्याप्रमाणावरील वापरला संमती देणारा युके हा देश पहिला ठरला.नव्वद वर्षीय महिला मार्गारेट किनन यांना यूकेमध्ये पहिली लस देण्यात आली. रशियात स्फुटनिक ५लशीची चाचणी अचूकता ९१.४% आढळून आली. त्यामुळे रशियात एक लाख लोकांना लस देण्यात आले. ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस कोव्हिड १९ची लक्षण निर्माण होण्यापासून ७०%संरक्षण देत असल्याचं चाचण्यात आढळले. न्यूयार्कमध्ये नर्स सॅन्ड्रा लिंडससे यांना लसीचा अमेरिकीकेतील पहिला डोस देण्यात आला.यासह अन्य यशस्वीतेच्या बळावर एप्रिलपर्यंत १०कोटी लोकांना लस देण्याचं उद्धिष्ट अमेरिकेने ठेवले. अशाप्रकारे जगात लसीकरणाचे प्रयत्न आज जोर धरत असले तरी भारतात मात्र आज लस उत्पादक कंपन्या संभाव्य दुष्परिणामांच्या भीतीने आपले कार्य थांबवल्याचे दिसते. त्यासाठी दुष्परिणामांच्या खटल्यातुन आपली सूट व्हावी यासाठी विशेष कायदा अस्तित्वात आणावे असे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यकार्यकारी अधिकारीआदर पुनवाला यांनी म्हटले आहे. खरे तर कोणत्यातरी प्रयोगात सकारात्मकता खूप महत्त्वाची असते.आज पुनावालांच्या प्रयत्नांना स्कारात्मकतेची साथ अपरिहार्य ठरते. नेपोलियन आपल्या सैन्यासह किनाऱ्यावर उतरत असतांना चक्क सैन्यासमोरच घसरून छातीवर आडवा पडला. छाती चिखलाने माखली.तेव्हा अंधश्रद्धाळू सैनिकांना वाटलं आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला प्रभाव होणार,आपली मुंडकी उडणार सैनिक भयभीत झाले ही बाब नेपोलियनने हेरली.तो उठताना छातीला झटकत म्हणाला मित्रानो आजचे युद्ध आपणच जिंकणार जिथे जिथे आपण जाऊ तेथे तेथे आपला विजय होणार कारण आल्या आल्या या भूमातेने मला आलिंगन दिले आहे.'मी तुझा आहे, मी तुझा आहे' असे म्हणत सैन्याचे मनोबल वाढवले आणि युद्धाला निघाला .त्यावेळी सगळीकडेच त्यांनी मोठी विजयश्री खेचून आणली. आज कोव्हिड -१९च्या संकटात एक मोठं युद्ध आपणास लढून करोना विषाणूवर विजय मिळवायचा आहे. कोव्हिड-१९च्या संकटाचा विचार केला असता पुनवाला यांनी सरकारला संभाव्यतेच्या दुष्परिणामांच्या बाबतीत सरकारकडे प्रस्ताव सादर केला.याबाबतीत ज्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. सध्या भारतात सात लसी दृष्टिपथात आहेत.त्यामध्ये भारत बायोटेकने आयसीएमआर सोबत विकसित केलेली लस. दुसरी झायडस, तिसरी जेनोव्हा, चौथी ऑक्सफर्डची सिरम इन्स्टिट्युटद्वारे चलवण्या येणारी, पाचवी स्पुट व्ही वॅक्सिन, सहावी बायोलॉजिकल ई. ली.अशा काही लसी आल्यातरी मुख्यत्वे करून आदर पुनवाला यांच्या लसिकडे देशाचे लक्ष लागले आहे. अधारावरचा विश्वास लक्षात घेता भारतीय लसीकरणाच्या बाबतीत पुनावाला आपल्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकतात.त्यासाठी गरज आहे ती सकारात्मक प्रतिसाद देण्याची.भारतातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातील लस उत्पादन केल्या जात असेल ही बाब वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसंदर्भात अभिमानास्पद आहे. ज्यावेळेस प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी सिरमला भेट दिली दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत सिरमचे पुनवाला यांनी कोविशिल्ड या लसीबाबत असे स्पष्ट केले होते की,इंडियन काँसिल ऑफ मेडिकल रिसर्च ने केलेल्या निरीक्षणात कोविशिल्ड सरस ठरली.व ती स्वदेशी दरम्यान जुलै २०२१पर्यंत ३०ते ४०कोटी डोस उपलब्ध होतील आणि साधारणता दर महिन्यास ५ते६ कोटी लस निर्मिती आणि त्यास साठवणुकीस पोषक असणाऱ्या कोल्ड स्टोरेजची उत्तम व्यवस्था असल्याचेही स्पष्ट दर्शीवले गेले. राटायर्स या जगविख्यात वृत्तसंस्थेच्या माध्यमातून असे कळले की सध्या अमेरिकी लस मॉडर्ना किंवा फायझर २०२१च्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत भारतात पुरवठा करणे अपेक्षित नाही.अशा परिस्थितीत विचार केला असता सिरम उत्पादित लसेचे पुनर्निरीक्षण करून त्यातील संभाव्य ही लस उपयोगात आणली तर आज घडीचा करोना संकटांवर आळा घातला जाऊ शकतो.फायझर या अमेरीकन लसचे लसीकरण करण्यात आल्यानंतर काही रुग्णात त्याचे दुष्परिणाम वाढले नंतर तपासांती असे सिद्ध झाले की फायझर ही वॅक्सिन अशाच रुग्णावर दुष्परिणाम दाखवत होती ज्यांना अलर्जी आहे.त्यामुळे अमेरिकीन औषध व अन्न प्रशासन विभागाकडून अलर्जीचे पाच नमुने तपासून फायझर संदर्भात घाबरून जाण्याचे कारण नसुम ती सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. अशाप्रकारचे काही प्रकार घडल्या गेले तर नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे उसळता जनसमुदाय हा प्रकार नाकारता येत नाही. त्यासाठी संभाव्य दुष्परिणामासंदर्भात लस उत्पादकांवर खटला चालवला गेला तर लस उत्पादनाची प्रक्रिया अपूर्ण राहील.त्यासाठी सुरक्षा कायदा होणे गरजेचे आहे. ज्या वेळेस कोरोनाची महाभयंकर लाट होती त्यावेळेसच्या परिस्थितीचा विचार केला असता कोणत्याही लस किंवा औषधाशिवाय जागतिक रुग्णमृत्यू दराच्या तुलनेने कमी होता. ज्या रुग्णांचा यात मृत्यु झाला त्यातील अधिकांश रुग्ण हे विविध आजाराने पीडित होते.परिणामी कोव्हिड -१९ या विषाणूला तोंड देण्यात त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी पडली.ज्यात वृद्ध,मधुमेही,दमा,यासारख्या आजाराने बाधित रुग्णांचा समावेश होता. रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात सरकार भर देत होते.यादरम्यान जी रुग्ण अंशी -पंचांशी वयोगटातील होती ती सुद्धा यातून बरी झाल्याचे अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत.आसपास खरे तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सकारात्मक विचार करून यातील कंपनी सुरक्षा कायद्यास मंजुरी देऊन भारतीय लसीकरण मोहिमेला सुरुवात होणे अपरिहार्य ठरते.
--मनोहर सोनकांबळे
(एम. फिल.संशोधक विद्यार्थी
माध्यमशास्त्र संकुल
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड
८८०६०२५१५०,८४५९२३३७९१
manoharsonkamble255@gmail.com )




0 टिप्पण्या