Header Ads Widget

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

सिद्धार्थ महाविद्यालय आणि शिक्षण प्रबोधिनी, नांदेड महाविद्यालयास नॅक दर्जा प्राप्त.

सिद्धार्थ महाविद्यालय आणि शिक्षण प्रबोधिनी, नांदेड महाविद्यालयास नॅक दर्जा प्राप्त.






स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड संलग्नित 2009 पासून पत्रकारिता क्षेत्रात दर्जेदार विद्यार्थी घडवण्याचं काम करत असलेल्या सिद्धार्थ महाविद्यालय आणि शिक्षण प्रबोधिनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, वसरणी, नांदेड या महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन संस्था बंगलोर द्वारा आज रोजी  "क" दर्जा प्रदान करण्यात आला.
    उच्चशिक्षण प्रदान करणाऱ्या महाविद्यालयाचा दर्जा ठरवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरून  राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (NAAC)  द्वारा उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांचे विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येते. मूल्यांकन परिषदेमार्फत मूल्यांकनात सिद्धार्थ महाविद्यालय आणि शिक्षण प्रबोधिनी नांदेड. येथे दिनांक 08 आणि 09 मे रोजी मूल्यांकन समिती उपस्थित होती त्यात अध्यक्ष : डॉ.आनंद शर्मा (प्र.कुलगुरू, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ वर्धा.), समन्वयक सदस्य :- सुमन पौल(प्रोफेसर), डॉ.प्राचार्य शिबा पी. (सदस्य) डॉ. बी. एस. पोणमुदिराज (नॅक समन्वयक) हे होते. सदरील समितीने  ऑनलाइन स्वरूपात महाविद्यालयाचे प्रत्येक निकषांच्या आधारे तपासणी करून सतत 02 दिवस  मूल्यांकन केले. या मूल्यांकनाच्या आधारे महाविद्यालयास दर्जा प्रदान करण्यात आला आहे.
       स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विना अनुदानित पारंपरिक अभ्यासक्रमाचे नॅक दर्जा प्राप्त करणारे हे पहिले महाविद्यालय होय. दर्जा प्राप्तीनंतर महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांच्या हितासाठी करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
                सदरील यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप आनंदराव गोणारकर, संस्थेचे कार्यवाहक डॉ.पंचशील केशवराव एकंबेकर, सचिव प्रेषित एकंबेकर, संस्थेचे पदाधिकारी डॉ. प्रवीण शिंदे, डॉ.विश्वलक्ष कालेकर, रोशनी ढवळे, डॉ.संजीवकुमार केशवराव एकंबेकर, सुनील गणपतराव ढवळे इत्यादींचे सहकार्य लाभले.
         महाविद्यालयाच्या आयक्यूएससी समन्वयक प्रा.संचिता केळकर, कार्यालयीन कर्मचारी प्रेमदास वाघमारे प्रा.गजेंद्र टोम्पे आणि इतर सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या